https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

लोटे औद्योगिक वसाहतीतील आगीचे सत्र सुरुच

0 78

एमआयडीसीतील संकल्प कंपनीत आग लागल्याने खळबळ
खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधाील एका कारखान्याला रविवारी सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने गेल्या काही वर्षांपासून अधुनमधून आग लागण्याचे सत्र सुरुच असल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लागली आहे. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलान घटनास्थळी धावत घेत ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील संकल्प इंडस्ट्रीज या कंपनीत रविवारी सायंकाळी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी धुराचे हवेत पसरलेले लोळ पाहून परिसरातील ग्रामस्थ व इतर कंपन्यांतील कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. लोटे औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांची संकल्प कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
कंपनीमध्ये धोकादायक पद्धतीने ठेवण्यात आलेल्या रसायनांनी पेट घेतल्याचे काही प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. एक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कंपनीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.