https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

वनवासी कल्याण आश्रमाची जनजाती आरक्षण मोहीम

0 86

उरण (विठ्ठल ममताबादे ) : बुधवार दि.18/5/2022 रोजी वनवासी कल्याण आश्रम च्या वतीने जनजाती आरक्षण मोहीम घेण्यात आली .त्या अनुषंगाने उरण तालुक्यातील पुनाडे वाडीवर जनजागृती मोहीम घेण्यात आली.

काही जनजाती बांधवानी  धर्मातर करून ते  दोन्ही ठिकाणी फायदे घेत आहेत.त्यामुळे मूळजनजाती बांधवांचे शैक्षणिक तसेच सरकारी नोकरीच्या दृष्टीने राखीव जागांबाबत नुकसान होत आहे.अश्या धर्मांतरित लोकांना एस टी कॅटॅगरीचे फायदे दिले जाऊ नये.यासाठी सरकार दरबारी निवेदन देणे यासाठी रायगड जिल्ह्यातून यासाठी  दिनांक 29/5/2022 रोजी मराठा समाज सभागृह, पेण येथे सभेचे आयोजन केले आहे .पुढच्या आपल्या जनजातीच्या भावी पिढीच्या आरक्षण तरतुदी साठी  व आरक्षणाचा फायदा मूळ जनजाती बांधवनाच मिळावा या साठी  मोठ्या संख्येने या सभेस येण्याचे आवाहन वनवासी कल्याण आश्रम  उरण तालुका अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी यावेळी केले.
प्रसंगी सनातन संस्था उरणचे कार्यकर्ते  योगेश ठाकूर,ऋषिका ठाकूर,चेतना पाटील उपस्थित होते. या प्रसंगी योगेश ठाकूर  यांनी हिंदू धर्माची व्याप्ती, पूजा अर्चना कशी शास्त्रीय पध्दतीने करावी ? प्रार्थना कशी करावी ? तसेच कुलदेवतेच्या नामजापाचे महत्त्व याविषयी माहिती दिली.
प्रसंगी उपस्थितांना महर्षी अध्यात्म विश्व विद्यालय या न्यासाच्या वतीने स्त्रियांना साड्या,कपडे, तसेच वनवासी कल्याण आश्रम च्या वतीने शाळेतील मुलांना चित्रकलेची आवड निर्माण होणे साठी चित्रकला साहित्य, वह्या, स्टेशनरी, खाऊ वाटप करण्यात आले.





Leave A Reply

Your email address will not be published.