Ultimate magazine theme for WordPress.

वर्तकनगर-उरण नामकरण सोहळा उत्साहात संपन्न

0 27

उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील मौजे आवरे येथील नव्याने विकसित होत असलेल्या गट १७४,१७७,१७८,१८३,१८४ क्षेत्रात मूळ गोवठणे गावातील वर्तक कुटुंबियांची वडिलोपार्जित जमीनी आहेत. बदलत्या गरजांनुसार वर्तक कुटुंबिय या क्षेत्रात घरे बांधून ते अनेक वर्षे वास्तव्यास आहेत.या क्षेत्रात येणारी हद्द ही आवरे ग्रामपंचायतीची असली तरी या क्षेत्रापासून आवरे गाव साधारणतः दीड किलोमीटर अतंरावर आहे. येथे पूर्वापार असणारी वर्तक कुटुंबियांची शेती,निवासस्थाने यांना एक ओळख मिळावी असा विचार संतोष वर्तक, मच्छिंद्र वर्तक,यशवंत वर्तक यांच्या मनात आला.मनात असलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांनी वर्तक परीवाराला साद घातली. आणि सादाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दि.१७ जुलै २०२२ रोजी वर्तक कुटुंबिय एकत्र येत नामकरण सोहळा साजरा केला.त्यांनी सदर क्षेत्राचा वर्तकनगर, ता.उरण,जि.रायगड असा नामकरण करून सदर नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळी या कार्यक्रमाला संतोष वर्तक,मच्छिंद्र वर्तक,यशवंत वर्तक,डि.के वर्तक ,सखाराम वर्तक,विक्रम वर्तक,संतोष द.वर्तक,प्रितम वर्तक,रोशन म्हात्रे,संकेत वर्तक,परेश वर्तक,अतिश वर्तक,उमेश वर्तक,पंकज वर्तक,गणेश वर्तक,गजानन वर्तक यांच्यासह विजया वर्तक,कल्पना वर्तक या जेष्ठ महिला देखिल उपस्थित होत्या.यावेळी नामफलकाचे अनावरण संतोष वर्तक यांनी तर उद्घाटन मच्छिंद्र वर्तक ,सखाराम वर्तक आणि यशवंत वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले.स्थानिक क्षेत्राला स्थानिक शेतकऱ्यांचे नाव लाभल्यामुळे परीसरात आनंद व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.