वशेणी येथे 12 वीच्या मुलांना मोफत पाठ्य पुस्तक वाटप
उरण (विठ्ठल ममताबादे ) : वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य आणि सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून परिसरात ओळख असणारे डाॅक्टर शरद गणपत पाटील यांचे दि.15/6/2022 रोजी दुखःद निधन झाले. त्यांच्या सेवाभावी स्वभावाला अभिवादन करण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने 12 वी च्या गरजू मुलांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी स्वर्गीय डाॅक्टर शरद पाटील यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून सार्वजनिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.तद् नंतर 12 वीच्या निवडक मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचा पूर्ण सेट वाटप करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश भरत म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे,वशेणी गावचे पोलीस पाटील दिपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड , मूर्तीकार जगन्नाथ म्हात्रे,राहूल पाटील, बळीराम म्हात्रे,गणेश खोत, अनंत तांडेल, विश्वास पाटील,रघुनाथ पाटील, नितीन पाटील, पुरूषोत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.