Ultimate magazine theme for WordPress.

वसई दरड दुर्घटना : मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0 44

मुंबई दि 13: वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत.
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.