वेश्वी आदिवासी वाडीत अन्न धान्य किट वाटप
चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड आणी सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर यांचा उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड आणी सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर यांच्या संयुक्त विद्यमानाने वेश्वी आदिवासी वाडीत कु. सिया जयप्रकाश पाटील हिच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्य अन्न धान्य वाटप चे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
चाईल्ड केअर सामाजिक संस्थे ने कोविड काळा पासून आदिवासी वाडीत अन्न धान्य वाटपाचे कार्यक्रम आजून सुरूच ठेवले आहे. नवघर गावाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील यांची मुलगी सिया हिचा प्रथम वाढदिवसा निमित्य वेश्वी आदिवासी वाडीत अन्न धान्य किट 50 आदिवासी कुटूंबियांना वाटप केले.सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कामगार नेते सुधीर भाई घरत उपस्थिती राहणार होते परंतु अन्य कामगार मिटिंग असल्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही.
तरी कार्यक्रमाला उपस्थिती मान्यवर अध्यक्ष -जाणता राजा प्रतिष्ठान विवेक भाई पाटील, अध्यक्ष -नवघर ग्रामस्त मंडळ जयप्रकाश पाटील,अध्यक्ष -चाईल्ड केअर संस्था विकास कडू, सदस्या -गामपंचायत नवघर मयुरी पाटील, मुख्याध्यापक- वेश्वी आदिवासी शाळा रमणिक म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम चाईल्ड केअर सामाजिक संस्था चे संस्थापक – अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली केला.
“विकास कडू आणी चाईल्ड केअर सामाजिक संस्था आज वर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे त्यांची हि सेवा म्हणजे खरोखर ईश्वर सेवा आहे” असे विवेक पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.तसेच “मी आणी सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर तर्फे चाईल्ड केअर सामाजिक संस्थे ला कुठलाही प्रकारची मदत करायचे ठरवले आहे
कारण हि संस्था खरोखर आशा दुर्मीळ भागात जाऊन समाज सेवा करणारी उरण तालुक्यात पहिलीच असेल ” असे नवघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.चाईल्ड केअर सामाजिक संस्थे मधील या तरुणांना त्यांच्या समाज सेवे साठी सलाम कारण आजचे तरुण वेळ मिळताच पार्ट्या आणी फिरण्यात वेळ घालवतात परंतु या संस्थे च्या तरुणांचे वेगळेच आहे असे वेश्वी शाळेचे मुख्याध्यापक रमणिक म्हात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले
सदर कार्यक्रमात शेकडो आदिवासी महिला भगिनी उपस्थित होत्या पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष विकास कडू यांनी केले.या कार्यक्रमासाठी सिया ची आत्या, मामा, भाऊ, काका इत्यादी परिवार उपस्थित होते.तसेच हे कार्यक्रम उत्तम रित्या होण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष विक्रांत कडू, कार्याध्यक्ष कु. ह्रितिक पाटील, खजिनदार कु. हर्षद शिंदे, उपाध्यक्ष मनोज ठाकूर,सदस्य विपुल कडू, रोशन धुमाळ आणी विवेक कडू आदींनी फार मेहनत घेतली.कार्यक्रमाचे निवेदन विवेक पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विक्रांत कडू यांनी केले