वैजनाथ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्यासह गणवेश वाटप
उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य तथा उरण विधानसभा राष्ट्रवादी काॅग्रेस अध्यक्ष वैजनाथ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे,स्वर्गीय तुप्ती सुधीर सुर्वे फांऊडेशन उरण व स्वर्गीय संगिता मच्छिद्र ठाकूर फांऊडेशन धूतुम यांच्या वतीने पुनाडे आदिवासी वाडीतील २००८ पासून दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य व गणवेश वाटपाचा कार्यक्रम आज पुनाडे आदिवासी वाडीवर आज (ता.१५ जुलै) ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅग्रेस सरचिणीस प्रशांत पाटील यांया अध्यक्षतेखाली करण्यात आला.
या वेळी प्रशांत पाटील यांनी वैजनाथ ठाकूर यांना शुभेच्छा देवून कार्यक्रम आयोजन करणाऱ्या सामाजिक संस्थांची प्रशंसा केली .या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅग्रेस महिला सरचिटणीस भावना घाणेकर ,वैजनाथ ठाकूर ,महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवेचे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण मनोज पाटील,पाणदिवेचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाटील ,निर्सग मित्र संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी ,गायक मोहन फुंडेकर ,विंधणे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत शेळके ,महेंद्र पाटील ,मकरंद ठाकूर, संदिप भोपरे ,विशाल पाटील,नेहरू युवा केंद्र अलिबाग चे माजी राष्ट्रीय सेवाकर्मी आकाश घरत आदि मान्यवर उपस्थित होते.