शालेय पोषण आहाराची होणार भरारी पथकामार्फत तपासणी
रत्नागिरी : शाळांमध्ये देण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहाराची आता भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकाची स्थापना करण्यात येईल. हे भरारी पथक अचानक शाळेला भेट देवून शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी होते का, याची पाहणी करणार आहे.
राज्यातील शाळांमधून शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कमी करणे, निकृष्ट प्रतीचा आहार मुलांना देणे, आहाराचे वाटप न करणे, योजनेमध्ये गैरव्यवहार करणे आदी स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत.