शाळा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील : ना. वर्षा गायकवाड
. .
मुंबई : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून शाळा सुरू होण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू करण्यात येतील. सल्लागार मंडळाशी चर्चा करून शाळांना कशी काळजी घ्यावी याबाबत सूचना देण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.