रत्नागिरी : शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी या संस्थेत शैक्षणिक सत्र ऑगस्ट २०२२ साठी विविध व्यवसायाच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया १७ जून २०२२ पासून सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेची माहिती http://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. इच्छुकानी अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी, नाचणे रोड, पो. एम.आय.डी.सी. ता.जि. रत्नागिरी (दूरध्वनी क्रमांक 02352-221414) येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांनी केले आहे.