.उरण दि 29(विठ्ठल ममताबादे ) : पागोटे गावातील श्री काशीनगरचा राजा हा उरण तालुक्यातील साखर चौत निमित्त येणारा सुप्रसिद्ध गणपती. 19 वर्षे पारंपरिक, सांस्कृतिक,अध्यात्मिक, शैक्षणिक, व सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून ओळखले जाते. अनेक मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी मंडळाच्या वतीने केले जातात. व कित्येक भाविक भक्त दर्शनास येत असतात.
यावर्षी गणपतीचे आगमन 11 सप्टेंबर ला होत असून 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावर्षी दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षीची सुरवात मंडळाचे पुस्तक प्रकाशन व वृक्षारोपण आणि खाऊ वाटप करून करण्यात आले .रायगड जिल्हापरिषद शाळा पागोटे येथे पार पडलेल्या सोहळयात पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच मिलिंद केशव तांडेल, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भार्गव पाटील, महिला सदस्य मिता किरण पंडित, हर्षाली निलेश पाटील, कौशिक रोडवेजचे मालक सुजित तांडेल, जोतेश तांडेल, शाळेचे मुख्याध्यापक संजय केणी, शिक्षक,विद्यार्थी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम अत्यंत सुंदर व उल्लेखनीय झाला. येणाऱ्या दिवसात ग्रामपंचायत पागोटे व मान्यवरांनी मंडळास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |