https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

शिवसेना उरण प्रणित श्री गणेश उत्सव मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0 62

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांची प्रमुख उपस्थिती

उरण दि 6 (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेनेच्या माध्यमातून नेहमी समाजपयोगी कार्यक्रम उरण मध्ये राबविले जातात.शिवसेना उरण प्रणित श्री गणेश उत्सव मंडळातर्फे मंगळवार दिनाकं 06 सप्टेंबर 2022 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तेजनक्ष हॉस्पिटलचे डॉ हंसराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या शिबिरात विविध आरोग्य तपासणी करण्यात आल्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर,उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी श्री गणेशाचे दर्शन घेऊन शिबिरात आपल्या आरोग्य तपासणी करून घेतल्या.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख विनोद म्हात्रे, माजी सभापती विश्वास म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष परमानंद करगुकर, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, अल्पसंख्याक सेल विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, शहर अध्यक्ष शदाब शेख,नगरसेविका वर्षा पठारे, महिला आघाडीच्या माजी उपजिल्हासंघटिका स्मितल पेडणेकर, तालुका संघटिका सुजाता गायकवाड, संपर्क संघटिका श्रद्धा सावंत, वंदना पवार, शहर संघटिका वीणा तलरेजा, मेघा मेस्त्री,मुमताज भाटकर, रंजना तांडेल, सायरा खान, उपविभागप्रमुख धीरज बुंदे, कार्यालयप्रमुख राजेश निकम, शाखाप्रमुख नियाज भाटकर,भारत पाटील,आचल शिंदे तसेच सर्व कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होते.

बीपी चेक,शुगर चेक,रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण,वजन चेक,हिमोग्लोबिन आदी तपासण्या यावेळी करण्यात आले.मोफत डॉक्टरांचा सल्लाही देण्यात आला.सदर आरोग्य शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.