Ultimate magazine theme for WordPress.

शिवसेना द्रोणागिरी नोड शाखेतर्फे वृक्षारोपण व युवासेना नामफलकाचे उद्घाटन

0 29

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती

उरण (विठ्ठल ममताबादे ): महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांच्या खंबीर  नेतृत्वाखाली  युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. १३ जून २०२२ रोजी द्रोणागिरी  नोड शहराच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार  मनोहरशेठ भोईर  यांच्या प्रमुख उपस्थितीत द्रोणागिरी चौक येथे  वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक कार्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे कौतुक केले आहे. तसेच युवासेनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख जगजीवन भोईर, शिवसेना संपर्कप्रमुख कल्पेश पाटिल, शिवसेना शहरसंघटक किसन म्हात्रे,सरपंच अमित भगत, उपशहरप्रमुख प्रतीक पाटील, युवासेना शहरप्रुख करण पाटिल, धनंजय शिंदे, सोमनाथ भोईर, अंकुश चव्हाण, अशोक पाटील, संजय कापसे, सन्नी पार्टे, रविना ठाकुर, अंकिता घरत, सुरेखा भोईर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.