Ultimate magazine theme for WordPress.

शिवसेना शाखा पागोटेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0 53

उरण दि 1 (विठ्ठल ममताबादे) : शिवसेनेने नेहमी सामाजिक बांधिलकी जपली आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यासाठी अवजड वाहतूक सेनेचे उरण तालुका उपाध्यक्ष कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा पागोटेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रायगड जिल्हा परिषद शाळा पागोटे येथे शाळेतील विदयार्थ्यांना पेन पेन्सील वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच मनोहर पाटील, शिवसेना सल्लागार रमेश पाटील, शाखा प्रमुख पागोटे – महेंद्र पाटील, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुमित पाटील, विदयमान सदस्य समीर पाटील, विभाग प्रमुख रजनीकांत पाटील , दिपक पाटील, अरुण पाटील, बाळकृष्ण पाटील, अरुण पाटील , कुमार मढवी, नितिन पाटील, राजिप शाळा अध्यक्ष पागोटे – महेश पाटील, विनय पाटील, मुख्याध्यापक संजय केणी, शिक्षक ध. रा पाटील , नामदेव म्हात्रे,जयत्री गावंड, अनंत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनंत पाटील यांनी केले. शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मिळाल्याने सर्व विद्यार्थी आनंदात होते. चांगले समाजोपयोगी उपक्रम राबविल्याने शाळेचे मुख्याध्यापक  संजय केणी यांनी कुणाल पाटील आणि शिवसेनेचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.