https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान – गाव तिथे शाखा-घर तिथे शिवसैनिक

0 82

उरणमध्ये नवीन शाखाप्रमुख यांच्या नियुक्या जाहीर

उरण (विठ्ठल ममताबादे ): सर्वत्र शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरु असून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान अंतर्गत- गाव तिथे शाखा-घर तिथे शिवसैनिक या माध्यमातून उरण मध्ये नवीन शाखाप्रमुख यांच्या नियुक्या रविवार दिनाकं 22 मे 2022 रोजी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात जाहीर करण्यात आल्या.शिवसंपर्क अभियानाचे प्रमुख ठाण्याचे खासदार राजन विचारे , जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्वाना नियुक्ती पत्र दिले. या मध्ये भेंडखळ शाखाप्रमुखपदी रमेश पाटील, आनंदनगर शाखाप्रमुख पदी मणीराम पाटील, भवरा बाध शाखाप्रमुख पदी रेहान असफाक मुन्शी व उपशाखाप्रमुख पदी असिफ अब्दुलसत्तार भालके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नियुक्ती प्रदान करते वेळी माजी जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, उपजिल्हाप्रमुख नरेश राहळकर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी एन डाकी, गटनेते गणेश शिंदे, जि प सदस्य विजय भोईर, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.