Ultimate magazine theme for WordPress.

शिव वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी मनोज घरत

0 22

उरण दि. 19 (विठ्ठल ममताबादे) : उलवे मधील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते मनोज विष्णू घरत यांचे आजपर्यंतचे कार्य, पक्षाबद्दलची त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा बघून शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे यांनी मनोज विष्णु घरत यांची नियुक्ती शिव वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी केली आहे. तसे अधिकृत नियुक्तीपत्र शिव वाहतूक सेनेच्या नवी मुंबई कार्यालय उदघाटन आणि नियुक्ती पत्रक वाटप कार्यक्रम प्रसंगी एपीएमसी मार्केट, वाशी,नवी मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात विठ्ठल मोरे यांनी मनोज घरत यांना दिले.

नवी मुंबई मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे, राष्ट्रीय अध्यक्ष मोहन गोयल, सरचिटणीस – निलेश भोसले, उपाध्यक्ष- साजित सुपारीवाला, महाराष्ट्र चिटणीस- नरेशभाई चाळके आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व पदाधिका-यांच्या उपस्थितीत मनोज घरत यांची शिव वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
मनोज घरत हे सुरवातीपासूनच शिवसेनेचे प्रामाणिक,कट्टर, एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.शिवसेना उलवे नोडचे शहर प्रमुख म्हणून त्यांनी 12 वर्षे एकनिष्ठेने काम केले.शिवसेनेच्या प्रत्येक संपात, आंदोलनात त्यांचा सहभाग असतो. पक्षाने कोणतेही काम सांगितल्यास ते जबाबदारीने ते काम पार पाडतात. पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. नवी मुंबई मधील उलवे परिसरात शिवसेनेचा तळागाळात प्रचार व प्रसार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

शासनाच्या अनेक योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा यासाठी ते सतत सर्वत्र फिरत असतात. त्यांच्या या कार्याचीच पोहोचपावती त्यांना शिव वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदाच्या रूपात मिळाल्याची भावना शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त्त केली आहे.मनोज घरत यांची शिव वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातून मनोज घरत यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या नियुक्ती बद्दल मनोज घरत यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.