Ultimate magazine theme for WordPress.

श्रीया फाऊंडेशन, पाले उरणने दिला शासकीय वसतिगृहातील निराधार महिलांना आधार.

0 103

उरण दि 27(विठ्ठल ममताबादे ): दिनांक 26/08/2022 रोजी कर्जत येथील शासकीय कृपा महिला वसतिगृहात श्रीया फाऊंडेशन पाले व आपले सरकार सेवा केंद्र कोप्रोली उरण यांच्या वतीने निराधार, मनोरुग्ण/मतीमंद महिलांच्या आधार नोंदणीचे काम करण्यात आले. एकूण 48 पैकी 27 महिलांचे आधारकार्ड उपलब्ध नसल्यामुळे त्यांची ओळख पटविण्याकरता, पुनर्वसनासाठी त्यांच्या गृहचौकशी तसेच इतर शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी आधार नोंदणीची आवश्यकता होती. सदर महिलांची मानसिक स्थिती पहाता त्यांना आधार नोंदणी करणेकमी संस्थेबाहेर नेणे शक्य नसल्याकारणाने त्यांचे आधार कार्ड नोंदणी करणेकामी श्रीया फाऊंडेशन पाले या संस्थेने पुढार घेतला व आपले सरकार सेवा केंद्र कोप्रोली उरण मार्फत 27 महिलांची आधार नोंदणी करण्यात आली. यावेळी शासकीय कृपा महिला वसतिगृह कर्जत रायगड अधिक्षक प्रविण पाटील,  जिल्हा महिला बाल विकास अधिकारी  विनीत म्हात्रे, शासकीय परिचारिका श्रीमती स्नेहल अलकुंटे, श्रीया फाऊंडेशन च्या अध्यक्षा स्मिता म्हात्रे, संदीप म्हात्रे, प्राजक्ता म्हात्रे, स्नेहा पाटील, महा-आयटी रायगड जिल्हा व्यवस्थापक सुनील तोंडलेकर, शरद थोरवे, महिला वसतिगृह कर्मचारी हृषीकेश साळे, रंजना लंगोटी, अनिता खोत, महेश जोशी व  इतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.