Ultimate magazine theme for WordPress.

श्रीराम सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ चिरनेरतर्फे सार्वजनिक गौरा-गणेशोत्सवाचे आयोजन

0 23

भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे मंडळातर्फे आवाहन

उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे ) : श्रीराम सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ चिरनेरची स्थापना १९९३ साली झाली असून दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी सार्वजनिक गौरा गणेशोत्सव मंडळातर्फे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.सालाबादप्रमाणे श्रीराम सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ चिरनेर यांच्या वतीने मंगळवार दि. १३/०९/२०२२ ते सोमवार दि.१९/०९/२०२२ रोजी श्रीराम मंदिर, चिरनेर (मधिलपाडा), ता. उरण, जि. रायगड येथे सार्वजनिक गौरा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

भाविक भक्तांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून गौरा-गणेशाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरनेर तर्फे भाविक भक्तांना करण्यात आले आहे.

सार्वजनिक गौरा गणेशोत्सव मधील कार्यक्रम खालीलप्रमाणे :-
दि. १३/०९/२०२२ मंगळवारी सकाळी १०:०० वा श्रीची प्राणप्रतिष्ठापणा,दुपारी १२.०० वा श्रीची महाआरती, सायंकाळी ७:०० वा. महाआरती व प्रसाद.

दि. १४/०९/२०२२ बुधवारसकाळी ७:००वा.श्रीची प्रांजळपूजा,सायंकाळी ७:०० वा.महाआरती व प्रसाद, रात्री ९:००वा.स्वर साधना कलामंच चिरनेर-संगीताचा कार्यक्रम.

दि.१५/०९/२०२२ गुरुवारसकाळी ७:०० वा. श्रीची प्रांजळपूजा, सायंकाळी ७:०० वा.महाआरती व प्रसाद, रात्री ०९ ते ११ वा.किर्तनकार महेश महाराज साळुंखे यांचे सुश्राव्य किर्तन.

दि. १६/०९/२०२२ शुक्रवारसकाळी ०७:०० वा. श्रीची प्रांजळपूजा,सायंकाळी ०६:०० वा.हरिपाठ पारायण सोहळा चिरनेर विभाग, सायंकाळी ७:०० वा.महाआरती व प्रसाद,रात्री ०९:०० वा.मनोरंजनात्मक कार्यक्रम बुगी वूगी,

दि. १७/०९/२०२२ शनिवारसकाळी ७:००वा. श्रीची प्रांजळपूजा,सायंकाळी ४:०० वा.श्री सत्यनारायणाची महापुजा,सायं ७:०० ते ९:०० वा.महाप्रसाद,

दि. १८/०९/२०२२ रविवारसकाळी ७:०० वा. श्रीची प्रांजळपूजा,सकाळी १० से सायं ४ वा.सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे नेत्र चिकित्सा शिबिर,रात्री ०९:०० वा.महिलांचा ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम.

दि. १९/०९/२०२२सोमवारसकाळी ०७:०० वा श्रीची प्रांजळपुजा,सायंकाळी ०४:३० वा.अभिषेक व उत्तरपुजा, सायंकाळी ५:०० श्रींची भव्य मिरवणूक व विसर्जन सोहळा.
असे कार्यक्रम सार्वजनिक गौरा गणेशोत्सव दरम्यान श्रीराम मंदिर, चिरनेर (मधिलपाडा), ता. उरण, जि. रायगड येथे संपन्न होणार आहेत.सदर कार्यक्रमांचा व दर्शनाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ चिरनेरचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल हरिश्चंद्र म्हात्रे,अध्यक्ष समीर गोपाळ डुंगीकर, सेक्रेटरी बळिराम महादेव फोफेरकर,उपाध्यक्ष नितिन मधुकर म्हात्रे, खजिनदार राजेश आत्माराम केणी, मंडळाचे सर्व सभासद व हितचिंतक यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.