श्री गणेश आरास स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण (विठ्ठल ममताबादे) : चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड तर्फे श्री गणेश आरास स्पर्धेला उरण तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाले असून एकूण उरण तालुक्यातील 158 श्री गणेश आरास हे स्पर्धेसाठी आलेले आहेत.
चाईल्ड केअरचे संस्थापक-अध्यक्ष विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली ही श्री गणेश आरास स्पर्धा घेण्यात आली आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी विक्रांत कडू (सोनारी ),समीर म्हात्रे (कळंबुसरे ), तुषार ठाकूर, राजेश ठाकूर (भेंडखळ),कुणाल पाटील (पागोटे), अभिषेक माळी (बालई),ह्रितिक पाटील (नागाव ),समीर पाटील (रांजणपाडा ),पराग ठाकूर (खोपटे ),रोशन धुमाळ, विवेक कडू या सर्व संस्थेच्या सभासदांनी खूप मेहनत घेतली.या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री सिद्धिविनायक मंदिर सोनारी येथे पार पडणार आहे. याची सर्व स्पर्धकांना माहिती दिली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी दिली आहे.
चाईल्ड केअर सामाजिक संस्था तर्फे डोंगराळ भागातील गरीब आदिवासी मुलांना दत्तक (एका वर्षाचा शिक्षणाचा सर्व खर्च )या उपक्रम साठी सर्व जनतेला हाक दिली आहे.त्या उपक्रमाला पाठिंबा म्हणून जगदीश मोरेश्वर म्हात्रे (ओनर -लकी मारिन शिपिंग &लॉजिस्टिक ), मनोज साळवे (प्रेन्सिपल-Eureka lnfosys school ),डॉ. अविनाश तांडेल(करळपाडा )यांनी आदिवासी मुलांना दत्तक घेण्याचे ठरवले आहे. यासाठी चाईल्ड केअर संस्थेने या मान्यवरांचे आभार मानले आहेत.Attachments area