उरण दि 24(विठ्ठल ममताबादे ) : भोईर आळी नवीन शेवा उरण येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली माऊली पायी दिंडी मंडळाच्या वतीने श्री संत भगवानबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्या निमित्ताने व एकादशी , दिंडी मंडळास विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . तसेच किर्तनाचा कार्यक्रमही करण्यात आला.ह.भ.प.नितिनजी महाराज म्हात्रे नविन शेवा यांचे ओहम वाघ्या सोहम वाघ्या या अभंगावर हरी कीर्तन झाले .महाराजांनी या अभंगाचे चिंतन मांडते वेळेस श्री संत भगवानबाबा ,चांगदेवबाबा ज्ञानोबाराया , तुकोबाराया नाथ बाबा , नामदेव महाराज यांच्या जिवनच चरित्रातील दाखले देत भक्ती कशी करावी हे सांगितले.
जयंती व सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायगड भूषन गुरूवर्य ह.भ.प देवजी महाराज केळिवाले व ग्राम सुधारणा मंडळ नवीन शेवा अध्यक्ष कमळाकर पाटिल हे होते.यांनी श्री संत भगवानबाबा व चांगदेव बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन केले .तर व्यासपीठ व श्रीगणेशाचे पूजन द्रोणागिरीचे शिवसेना शहर अध्यक्ष जगजीवन भोईर यांनी केले.कार्यक्रमाचे मानकरी दयाळशेठ भोईर व प्रतिभाताई भोईर हे होते .कार्यक्रमाच्या व्यासपिठावर प्रमूख पाहूणे म्हणून ह.भ.प देवजी महाराज केळीवाले ,हिन्दुं रक्षक समिती अध्यक्ष दयाळशेठ भोईर,प्रतिभाताई भोईर , हवसाताई भोईर , जगजीवन भोईर , सुनील पांजेकर पंडरीनाथ घरत ,हरेश्वर पाटिल, वेदांत म्हात्रे , दत्ता महाराज गांधी,भारत भोईर ,ओम साई भक्त भजन मंडळ ,श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला भंजन मंडळ व नवीन शेवा ग्रामस्थ मंडळी , उरण परिसरातील वारकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी मंडळाकडून करण्यात आले होते.मंडळाचे अध्यक्ष समाजप्रबोधनकार ह.भ.प.राजेंद्र महाराज केंद्रे नविन शेवा यांनी मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानले.