चालक थोडक्यात बचावला
संगमेश्वर : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर नजीक ओझरखोल येथे सकाळच्या सुमारास ट्रक दरडीवर धडकून अपघात झाला. रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने जात असताना ट्रक चालकाला झोप अनावर झाल्याने ट्रक विरुद्ध दिशेला जाऊन दरडीवर आदाळला. अपघात होताना ट्रक चालकाने क्लिनरच्या बाजूच्या सीटवर उडी घेतल्याने सुदैवाने बचावला. अन्यथा जीवितहानी झाली असती. हा ट्रक रस्त्याच्या मधोमध असल्याने एका बाजूने वाहतूक सुरू हाेती.