Ultimate magazine theme for WordPress.

सर्पमित्रांना ओळखपत्र, मोफत उपचार आणि विमा संरक्षण द्यावे

0 39

वटवृक्ष सामाजिक संस्थेची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे ) : जागतीक सर्प दिनाचे औचित्य साधून सर्पमित्रांना शासन मान्य अधिकृत ओळखपत्र तसेच स्नेक रेस्क्यू ऑपरेशन करताना सर्पदंश झाल्यास मोफत उपचारासोबत त्यांना विमा संरक्षण कवच मिळण्याबाबत उरण वनविभागाचे वन क्षेत्रपाल एन. जी. कोकरे यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे मागणी वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी केली. यावेळी परिमंडळ वनअधिकारी संजय पाटील उपस्थित होते. सर्प वाचवा निसर्ग वाचवा असे आवाहन वन विभाग करीत असतो. एखादा साप नागरीवस्तीत आढळून आल्यास सर्पमित्रांना बोलावून सापाला त्यांच्या स्वाधिन करतात.पकडेला साप हा जंगल परिसरात मुक्त करुन सर्पमित्र सापाला जीवनदान देण्याचे कार्य करीत असतात. ह्यासाठी सर्पमित्रांना कोणतेही मानधन नसताना ही स्वखर्चाने ही निसर्गसेवा करीत असतात. बरेच सर्पमित्र हे वयक्तिकरित्या तर काही सर्पमित्र हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून सर्प वाचवा मोहित राबवित असतात. पर्यावरण व वन्यजीव संरक्षणात सर्पमित्रांचे खुप मोठे योगदान आहेत.अशा सर्व सर्पमित्रांची, सामाजिक संस्थाची तालुकास्तरावर मोट बांधून वनविभागामार्फत वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम कायद्याअंतर्गत सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे. त्याचबरोबर ओळखपत्र धारक सर्पमित्रांना स्नेक रेस्कू ऑपरेशन दरम्यान सर्पदंश झाल्यास मोफत उपचारासोबत सुरक्षित भविष्यासाठी विमा संरक्षण मिळावा याबाबत वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी वन विभागाकडे तसेच संबंधित प्रशासनाकडे मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.