Ultimate magazine theme for WordPress.

सर्पमित्रांनी दिले अजगराला जीवनदान !

0 19

उरण (विठ्ठल ममताबादे ) : जुन महिना संपला तरी सुद्धा पाऊस हा दडी मारून बसला  आहे. उष्णतेमुळे हैराण झालेल्या माणसासोबत जंगलातील वन्यजिवांच्या जीवन शैलीतही बदल झाले असून आपल्या खाद्याच्या शोधात फीरत‌ असलेले सरपटणारे प्राणी गाव वस्तीत आपले भक्ष शोधण्यासाठी पोल्ट्री फार्म ,शेळीच्या कळपात शिरून आपली भूक भागवतात.असाच एक 8.5 फुटी अजगर चिरनेर येथील गजानन केणी यांच्या शेतावर कोंबड्याच्या शोधात आला होता. अजगर दिसताच क्षणी तेथे राहत असणारा गजानन केणी यांचा मुलगा निलेश केणी यांनी तातडीने वन्य जीव निसर्ग संरक्षण संस्था चेिरनेरचे               सर्प मित्र काशिनाथ खारपाटील यांना फोनद्वारे पाचरण केले .त्यांनी सुद्धा वेळ न दडवता आपला सहकारी सर्पमित्र मनोहर फुंडेकर यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहचून त्या अजगरला आपल्या कौशल्याने पकडून चिरनेर येथील राणसई परिसरातील बेलडोंगरी या भागात उरणचे वनरक्षक संतोष इंगोले, राजेंद्र पवार,पनवेल विभागातील भाऊ साहेब सी.डी. पाटील, सय्यद मुबारक यांच्या समवेत संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी ,सदस्य काशिनाथ खारपाटील यांनी त्या अजगराला जंगलात सोडून जीवन दान दिले.सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असणारे सरपटणारे प्राणी जसे  जोमाने पाऊस सुरु होईल त्यावेळी हे प्राणी मानवी वस्तीत येतात. आपले भक्ष शोधण्यासाठी सर्वत्र संचार करतात.असे सरपटणारे प्राणी दिसताच अशा वेळी वन्य जीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांशी संपर्क साधावे अशी माहिती अध्यक्ष विवेक केणी यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.