उरण दि. 2 (विठ्ठल ममताबादे ) : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या, गडकिल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण करणाऱ्या सहयाद्री प्रतिष्ठान या संघटने तर्फे उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गसंवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सहयाद्री प्रतिष्ठान उरण विभागाचे पदाधिकारी सदस्यांनी एकत्र येत द्रोणागिरी किल्ल्यावर साफसफाई केली. विशेष म्हणजे 6 वर्षाच्या साई गोवारी या चिमुकल्याने न दमता, न घाबरता गड चढला व गडावरील प्लास्टीक कचरा जमा केला.एकंदरितच दुर्गसंवर्धन मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सहयाद्री प्रतिष्ठान ही संघटना गड किल्ल्यांचे संवर्धन व
संरक्षण ण करणारी संघटना असून सहयाद्री प्रतिष्ठानने राबविलेल्या दुर्गसंवर्धन मोहिमेचे सर्वत्र कौतूक होत आहे.