सामंत वरिष्ठ महाविद्यालयामध्ये करियर कट्ट्याचे आयोजन
रत्नागिरी : पाली येथील डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालय पाली, रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे यांचे आएएस आणि उद्योजक आपल्या
भेटीला या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर श्री. यशवंत शितोळे रत्नागिरी जिल्हा करियर कट्टा समन्वयक, डॉ. आवटी, प्रा. सुर्वे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांता
कांबळे, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे व प्रा. सुभाष घडशी उपस्थित होते. मार्गदर्शन करतान श्री. शितोळे सर यांनी असे संगितले की, करियर निवडताना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही यशस्वी अधिकारी घडू शकता, पण त्यात जर अपयश आले तर खचून न जाता प्लॅन B म्हणून दूसरा पर्याय तयार असणे गरजेचे आहे. तसेच उद्योजक होण्यासाठी उपजत गुण असावे, असे नसून प्रशिक्षणाच्या माध्यमातून, कौशल्य आत्मसात करून तुम्ही यशस्वी उद्योजक घडू शकतो.
यावेळी अध्यक्षीय मनोगतातून डॉ. कांता कांबळे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांटा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पार पडला. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद, ग्रंथपाल, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुभाष घडशी व आभार प्रा. वीणा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. भूषण पाध्ये यांनी केले.