सोनारीतील श्री सिध्दिविनायकाची अंगमुर्ती व पालखीतल्या गणेशमुर्तीला सोन्याचा मुलामा
सोनारी गावातील व्यावसायिक किशोर हरी कडू यांचा उपक्रम
उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे ) : सोनारी गावातील प्रसिध्द श्री सिध्दिविनायकाच्या अंगमुर्तीला तसेच माघी गणेशोत्सवाच्या वेळेला पालखी सोहळयात मिरविण्याच्या श्री गणेशाच्या मुर्तीला सोन्याचा मुलामा देण्याचे काम सोनारी गावातील व्यावसायिक श्री सदगुरु कृपा फ्रेट सव्हिसेसच्या प्रोप्रायटर सेजल किशोर कडू व किशोर हरी कडू यांनी केले असून त्यानी श्री सिध्दिविनायकाच्या अंगमुर्तीच्या वर चांदीचा छत्र व चांदीचा ऊंदीर मामा श्री चरणी अर्पण केला आहे.
किशोर हरी कडू हे सोनारी गावातील रहिवाशी असून जेएनपीटी मधील सेवानिवृत्त कामगार आहेत. दरवर्षी श्री सिद्धिविनायकाच्या माघी पालखी सोहळ्यास ते सढळहस्ते मदत करीत असतात. त्यांचे मोठे बंधु चंद्रकांत हरी कडू यांनी श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरातील सर्व किमती वस्तुचे योग्य ठिकाणी जतन करण्यासाठी मंदिरातील एका खोलीत संपूर्ण लादीकाम केले असून त्यांचे लहान भाऊ अरविंद हरी कडू यांनी फर्निचरचे काम केले आहे. तसेच ते दरवर्षी त्याची आई वै.ह भ प रुक्मिणी हरी कडू यांच्या स्मरणार्थं गणेशजन्माच्या किर्तनकारांना वस्त्र भेट देत असतात. किशोर हरी कडू व त्यांच्या संपूर्ण कुटूंबाने श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरात केलेल्या कामाबद्दल ग्रामसुधारणा मंडळाने त्यांचा व त्याच्या कुटुंबियांचा यथोचित सन्मान केला असून सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.