सोनारी येथील आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे ): शुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल यांच्या विशेष सहकार्याने,सोनारीचा राजा महिला ग्राम संघाचे अध्यक्ष सुजाता कडू व सिद्धी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोनारी येथील आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे अशी माहिती आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे यांनी दिली.
सोनारी येथील सिद्धी क्लिनिक येथे डॉ सचिन चव्हाण, डॉ श्रद्धा चव्हाण, शुश्रुषा हॉस्पिटलचे डॉ राजेंद्र क्षीरसागर, जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे आणि इतर नर्सिंग स्टाफ यांच्या सहकार्याने हृदयरोग तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली.सदर शिबीर पूर्ण करण्यासाठी गावातील महिला महासंघाच्या अध्यक्षा सुजाता दिनेश कडू, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण कडु, उपाध्यक्ष रोहिदास पाटील, संस्थापक दिनेश कडू, सदस्य के के कडू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराची सांगता नवी मुंबई मधील आरोग्य क्षेत्रातील प्रसिद्ध जनसंपर्क अधिकारी कुमार लोंढे, डॉ सचिन चव्हाण, डॉ राजेंद्र क्षीरसागर, व नर्सिंग स्टाफचे पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले.100 हुन अधिक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.