देविदयालतर्फे सूक्ष्म व्यावसायिक महिलांना १०० शितपेट्या उपलब्ध
रत्नागिरी : घरातून अथवा छोट्या दुकानातून मत्स्य विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सूक्ष्म उद्योजक महिलांना सौर उर्जेवर चालणाऱ्या १०० शितपेट्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. छोट्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीचा सामना करण्यासाठी तसेच भारत सरकारच्या निर्देशाप्रमाणे अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या देविदयाल सोलर सोल्युशन आणि विल्ग्रो इनोव्हेशन फाऊंडेशनच्या सहकार्याने आपल्या रत्नागिरी येथील नवीन प्रकल्पामार्फत मत्स्य विक्री करणाऱ्या महिलांना या शितपेट्या अनुदान तत्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. या मुळे मच्छिमार महिलांना महिन्याकाठी ५ हजार रुपये अधिकचे उत्पन्न मिळू शकणार आहे, अशी माहिती देवीदयाल सोलरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी तुषार देवीदयाल यांनी दिली.
या उपक्रमामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील १०० महिला लाभार्थींना ८० टक्के अनुदानावर सौर शीतपेट्या मिळणार आहेत. या महिला प्रामुख्याने स्थानिक सूक्ष्म-उद्योजकी आहेत. देविदयाल सौर उत्पादन आठवड्यातील चोवीस तास सौर ऊर्जेवर चालते. बर्फ व वीज खर्चात त्यामुळे वाचणार असून त्या महिला त्यांचे माशे खराब होण्यापासून वाचवू शकणार आहे त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान कमी होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना तुषार देवीदयाल म्हणाले की, “मत्स्यव्यवसाय विभागातील कमी उत्पन्न देणाऱ्या कुटुंबांचे सक्षमीकरण करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. आमच्या संशोधनातून समोर आले आहे की, या क्षेत्रातील बहुसंख्य महिलांचा मासेमारी हा कौटुंबिक व्यवसायात आहे. तरीही त्यांचा सहभाग पुरुषांएवढा समर्पकपणे ओळखला जात नाही. म्हणून, आम्ही स्थानिक महिलांच्या मालकीच्या व्यवसायांना अनुकूल आणि समर्थन देण्यासाठी ही एक संधी निर्माण करीत आहोत. त्याद्वारे या समुदायाच्या समोर न आलेल्या क्षमतांना प्रोत्साहन देले जाईल. सौर उर्जेवर विकेंद्रित सौर उर्जेवर चालणाऱ्या शीतपेटीद्वारे समस्यांचे निराकरण करून उपजीविकेच्या संधी वाढवणे आमचे उद्धिष्ट आहे” , असे मत देविदयाल यांनी व्यक्त केले.