स्पेशल चाईल्ड विनम्र खटावकरने केली ९९९९ पायऱ्यांची गिरनार यात्रा पूर्ण
कळसूबाई शिखर, हरिश्चंद्र गड, रांगणा किल्ला, पन्हाळा ते पावनखिंड या पूर्वीच सर
रत्नागिरी : जोतिबा परफेक्ट अँड सेफ ग्रुप (जे -पास ग्रुप) कोल्हापूर या ट्रेकिंग ग्रुपच्या वतीने या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. अविनाश हावळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ७१ स्त्री- पुरुष ट्रेकर्स सोबत चेतना विकास मंदिर,शेंडा पार्क, कोल्हापूरचा विद्यार्थी, स्पेशल चाईल्ड कुमार विनम्र अनिल खटावकर (पालशेत ता.गुहागर येथील गणेश मूर्तीकार कै. जनार्दन वेल्हाळ यांचा नातू) याने गुजरातमधील जुनागड जिल्ह्यामधील 9999 पायऱ्या असलेल्या गिरनार पर्वताची यात्रा सोमवार दि. १८ जुलै २०२२ रोजी यशस्वीपणे पूर्ण करून, श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घेतले तसेच हजारो वर्षांपासून श्री दत्त महाराजांनी जो अग्नी (दत्त अग्नी) प्रज्वलित केला याचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. हे दर्शन फक्त प्रत्येक सोमवारीच मिळते.
ही 9999 पायऱ्यांची यात्रा स्पेशल चाइल्ड विनम्र याने बरोबर 4 तासात पूर्ण केली. ही यात्रा पूर्ण करण्यासाठी यात्रेपूर्वी कुमार विनम्र व त्याची आई विजया अनिल खटावकर यानी त्यांचे प्रशिक्षक श्री. अविनाश हावळ यांच्या सोबत रोज 3000 पायऱ्या चढण्याचा खडतर असा सराव केला होता.
या पूर्वी विनम्र याने कळसूबाई शिखर, हरिश्चंद्र गड, रांगणा किल्ला, पन्हाळा ते पावनखिंड इत्यादी ट्रेक पूर्णपणे यशस्वी केले आहेत
वैशिष्ट्य म्हणजे स्पेशल चाईल्ड या गटातील हा पहिलाच विद्यार्थी ज्याने 9999 पायऱ्यांची गिरनार पर्वताची यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली.
विनम्र याच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे