सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या दरे ता. महाबळेश्वर या मूळगावी आले असता येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व हर घर तिरंगा उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करुन दरे गावातील ग्रामस्थांना तिरंगा ध्वजाचे वितरण केले.
यावेळी ग्रामस्थांनी देखील आपल्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, महाबळेश्र्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.