मासेमारांचं नशीब फळफळलं
रत्नागिरी : मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. ३१ मे नंतर मासेमारी बंदी लागू होणार असली तरी ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारी करणार्यांसाठी शेवटचा आठवडा महत्वाचा ठरत आहे. किनारी भागात काही प्रमाणात कोळंबी मिळत असल्याने त्यावर अनेकांच्या उड्या पडल्या आहेत.
प्रवाह बदलामुळे कोळंबी किनार्यावर येऊ लागली असे काही मच्छिमारांच निरीक्षण आहे. गणपतीपुळे, गावखडी, जयगड किनारी अनेक मच्छिमार मासेमारी करताना दिसत आहेत.