खांबेरे ग्रा. पं. हद्दीतील १२२ नागरिकांची आरोग्य तपासणी
रोहा : खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील गायचोळ आदिवासी वाडी येथे हंटसमन इंटरनॅशनल इंडिया प्रा लिमिटेड यांच्या व फ्रीडम फॉर यू फौंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने आदिवासी समाजातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२२ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य विषयक सल्ला देऊन आवश्यक प्रोटिन्स ,लोह ,खनिज यांची कमतरता दूर करण्यासाठी औषधांचे वाटप करण्यात आले.
ही संस्था मागील चार वर्षांपासून ठाणे,मुंबई, पालघर,रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी पाडे, वस्त्या तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करत असून त्याचा गरीब नागरिकांना मोठा फायदा होत आहे.गायचोळ येथील शिबिरात डॉ रवी कुमार,डॉ प्रिती दुबे,वरिष्ठ प्रोग्राम मॅनेजर व्हेलॉइस फर्नांडिस,मॅनेजर विधी प्रेमचंदानी,योग तज्ञा डॉ रश्मीता तसेच परिचारिका सुनिता विश्वकर्मा, खुशबू गौतम, वर्षा जाधव यांनी सहभाग घेत नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी महेश पेंडसे, हरिष राणे, पत्रकार जितेंद्र जोशी तसेच आशा सेविका रसिका सावंत स्थानिक अंगणवाडी सेविका निलिमा शेडगे ,मदतनीस जया वाघमारे,माजी सरपंच तुळशीराम पवार, ग्रामपंचायत उपसरपंच सौ जोशी मॅडम, ग्रामपंचायत सदस्या वंदना रामा पवार यांनी मोलाचे योगदान दिले. या आरोग्य शिबिराचा स्थानिकांना चांगला फायदा होणार असून लहान मुलांपासून ऐंशी वर्षांच्या वृद्धेपर्यंत साधारणपणे 125 नागरिकांनी यात सहभाग नोंदवला.