Ultimate magazine theme for WordPress.

हातखंबा येथे तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

0 57

प्रश्नमंजूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षात जयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचे र्निबध शिथील झाल्याने भारतीय बौद्ध महासभेच्या हातखंबा गाव शाखेने मोठय़ा उत्साहात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा केला.

या निमित्त बोधिसत्व बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष अनंत कांबळे तसेच संबोधी महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा कांबळे यांच्या अध्यक्षेखाली दिवसभर विविध कार्यक्रम झाले. संयुक्त जयंती उत्सवात सकाळच्या सत्रात सामूहिक पद्धतीने संपूर्ण परित्राणपाठ केला. खिरदान व भोजनदान केले तर दुपारच्या सत्रात तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर बुद्ध-भीम प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला. बुद्ध भीम प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी घेतलेल्या स्पर्धकांमधून विजयी स्पर्धकांना बोधिसत्व बौद्ध विकास मंडळाचे माझी अध्यक्ष जयराम कांबळे यांच्या सौजन्याने चार पारितोषिके देण्यात आली. यामधे प्रथम क्रमांक तेजस कांबळे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक प्रांजली कांबळे तर तृतीय क्रमांक दिक्षा कांबळे, आणि उत्तेजनार्थ दिपाली कांबळे यांना देण्यात आला.

या विजयी स्पर्धकांना ‘एक वही व एक पेन’ आणि पारितोषिक वितरण करण्यात आले.

बोधीसत्व बौद्ध विकास मंडळातील विद्याधर कांबळे (गुरुजी) , राजेंद्र कांबळे, सुनील कांबळे, महेंद्र कांबळे, प्रदीप कांबळे इतर सर्व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संयुक्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भीमगीतांचा जल्लोष या कार्यक्रमातील गायकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष कांबळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.