https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

हितेंद्र म्हात्रे यांचा मृतदेह उरण समुद्रकिनारी सापडला

0 92


उरण दि 7(विठ्ठल ममताबादे ): बेपत्ता झालेल्या हितेंद्र म्हात्रे याचा मृतदेह उरण समुद्रकिनारी आढळून आला आहे. हितेंद्र हा दि. ६ पासून घरातून बेपत्ता झाला होता.

दिनांक 7/7/2022 रोजी उरणमधील पिरवाडी समुद्र किनारी दर्गाच्या पाठीमागे एक मृतदेह आढळून आला. घटना स्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले. चौकशीअंती पोलीस कर्मचाऱ्यांना तपासात आढळले की, सदर मृतदेह करंजा येथील हितेंद्र राजेंद्र म्हात्रे वय 31, करंजा  यांचा आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव हितेंद्र राजेंद्र म्हात्रे वय 31 वर्षे, व्यवसाय- नोकरी, राहणार साईनगर, द्रोणागिरी हायस्कूलच्या बाजूला, करंजा, तालुका उरण,जिल्हा रायगड बांधा -मजबूत, उंची 6 फूट, रंग गोरा, नेसणीस -टी शर्ट, नेव्ही ब्लू रंगाची जीन्स व रेनकोट परिधान केलेला दिनांक 6/7/2022 रोजी सकाळी 11:30 वाजता घराबाहेर पडला तो घरी परतलाच नाही.

या बाबत हितेंद्र म्हात्रे हरविल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात त्याच्या कुटूंकबीयांनी केली होती. उरण समुद्रकिनारी दर्गाच्या पाठीमागे मिळालेले मृतदेहचे रंग, रूप आदी सर्व माहिती उरण पोलीस स्टेशन मध्ये हरविलेल्या तक्रारीशी पूर्णपणे मिळती जुळती होती. सदर मृतदेह हितेंद्र म्हात्रे यांचेच असल्याचे पोलिसांनी खात्री केली.
मृत व्यक्ती हितेंद्र राजेंद्र म्हात्रे हे पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते की त्यांनी आत्महत्त्या केली किंवा त्यांचा कोणी खून केला हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा पुढील तपास उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.