हुतात्म्यांना अभिवादन करून महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली जासई ते चिरनेर आझादी गौरव पदयात्रा
उरण दि 9 (विठ्ठल ममताबादे ) : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षा निमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील प्रत्येक जिल्ह्यात आझादिका झेंडा गौरव महोत्सव अंतर्गत 75 किलोमीटर आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे.त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील जासई ते चिरनेर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील या पदयात्रेत मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले होते.
उरण तालुक्यातील जासई येथील हुतात्मा स्मारकांना मानवंदना तसेच लोकनेते दि.बा. पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरवात करण्यात आली.सकाळी 10:30 वाजता जासई येथून चिरनेर साठी पदयात्रा प्रस्थान झाली. जासई चिर्ले, वेश्वि, दिघोडे,विंधणे, गावठान,भोम ते चिरनेर अशी पायी पदयात्रा झाली .पायी पदयात्रा करत असताना काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, सोनिया गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. काँग्रेस जिंदाबाद असे विविध घोषणा देण्यात आल्या.शेवटी दुपारी 2:30 वाजता चिरनेर येथील 1930 साली हुतात्मे झालेल्या हुतात्मा स्मारक येथे पदयात्रेचा समारोप झाला .जवळ जवळ 20 ते 22 किलोमीटरच्या या पदयात्रेत महिला व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पदयात्रेवेळी रायगड जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत पाटील ,राजाभाऊ ठाकूर, मिलिंद पाडगांवकर, श्रद्धा ठाकूर, विनोद म्हात्रे, डॉ. मनिष पाटील,अखलाक शिलोत्री, किरीट पाटील, मार्तंड नाखवा, संजय ठाकूर, महेंद्र ठाकूर,संध्याताई ठाकूर,बाजीराव परदेशीं,भालचंद्र घरत,कमलाकर घरत,रेखा घरत, निर्मला पाटील,सागर सुखाडे , दिनकर म्हात्रे, निखिल ढवले, रोहित घरत, आनंद ठाकुर, लंकेश ठाकुर,अंगद ठाकुर, सविता केणी, तुषार पाटील, घणश्याम पाटील,रामनाथ पंडित, लक्ष्मण ठाकुर, कल्पना ठाकुर, दिपाली म्हात्रे ,सुमन पाटील, जयराम पाटील, रघुनाथ ठाकुर, रेखा जाधव,प्रकाश पाटील,रमेश पाटील, प्रेमनाथ ठाकूर, विनोद पाटील,अलंकार परदेशी,विवेक म्हात्रे, आदित्य घरत, विकी पाटील, विवेक म्हात्रे, सुभाष घरत,प्रीती पाटील, संगीता म्हात्रे,वंदना म्हात्रे, वंदना पाटील, अश्रेया शिवकर, योगसाधना पाटील यांच्या सह शेकडोंच्या संख्येने कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.