एकलव्य करिअर अकॅडमीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांच्या हस्ते उदघाटन
उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) : जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळावा, जास्तीत जास्त तरुणांना नोकरी मिळावी. देश सेवेतून तरुणांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे या दृष्टीकोणातून राष्ट्रीय खेळाडू राम चौहान यांनी आजपर्यंत अनेक तरुणांना प्रशिक्षण दिले.राम चौहान यांच्या मार्गदर्शनामुळ 4 पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर व 19 पोलीस कॉन्स्टेबल भरती झाले आहेत .बेरोजगार युवकांसाठी काहीतरी करण्याची राम चौहान यांची संकल्पना होती. जेणेकरून युवक स्वतःच्या पायावर उभे राहतील.त्यांनी यासाठी आपली संकल्पना एकलव्य करिअर अकॅडमी स्थापन करून प्रत्यक्षात आणली. असे गौरवोदगार न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी काढले.
श्रीराजनगर अपार्टमेंट, गाडे हॉस्पिटल जवळ, कामठा रोड उरण शहर येथे पोलीस भरती, सैन्य भरतीचे मार्गदर्शन करणाऱ्या एकलव्य करिअर अकॅडेमीची स्थापना करण्यात आली. त्यावेळी महावीर जाधव बोलत होते.सध्या अनेक तरुण पोलीस भरती, सैन्य भरती साठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. योग्य मार्गदर्शन अभावी पात्रता असून देखील स्थानिक युवकांना, भूमीपुत्रांना नोकऱ्या मिळत नाहीत. मात्र योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या नोकऱ्या युवकांना, बेरोजगारांना प्राप्त होतील. त्यामुळे युवकांनी, स्थानिक भूमीपुत्रांनी एकलव्य करिअर अकॅडेमी सारख्या संस्थेत प्रशिक्षण, मार्गदर्शन घेऊन नोकरी मिळवून स्वतः च्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे असे मनोगत उदघाटन प्रसंगी महावीर जाधव यांनी व्यक्त केले.यावेळी एकलव्य करिअर अकॅडेमीचे संस्थापक राम चौहान, सुप्रसिद्ध योगा शिक्षिका पूनम चौहान, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश भारती आदी मान्यवर उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब कट पाले, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस शिपाई दत्ता गावडे , मंगेश पार्ट, सुबोध माळगावकर , रवी सावंत, महिला पोलीस शिपाई देविना भोईर , जुईली तांडेल, सुप्रिया तांडेल ,करिष्मा ठाकूर ,स्वीटी टिके जया खांडेकर ,किरण , प्रियंका भगत, स्वीटी वाणी, सुरेखा राठोड, अपर्णा म्हात्रे, आरती गावंड ,कोमल शिंदे इत्यादी अनेक तरुण-तरुणी पोलीस भरती सीआयएसएफ, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, आर्मी भरती मध्ये एकलव्य अकॅडमीच्या माध्यमातून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले आहेत.