Ultimate magazine theme for WordPress.

एनएमएटी बस सेवेला रिक्षा, टॅक्सी चालक मालकांचा तीव्र विरोध

0 127

गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गावर NMMT चे बस सुरु करण्यात येऊ नये अशी ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक मालकांची मागणी

उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण पूर्व विभागातील जनता, प्रवाशी कर्मचारी वर्ग खूप मोठया प्रमाणात नोकरीसाठी, व्यापार, उद्योग धंद्यासाठी वाशी, जुईनगर, बेलापूर, कळंबोली, कामोठे खारघर आदी ठिकाणी नेहमी प्रवास करीत असतात. गव्हाण फाटा ते चिरनेर या मार्गावर NMMT (नवी मुंबई परिवहन सेवा )ची बस सेवा नसल्याने अनेक वर्षांपासून ते आजपर्यंत या मार्गावर ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक आपली सेवा प्रामाणिकपणे प्रवाशांना जनतेला देत आहेत. कोरोना काळात सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता रिक्षा चालक, टॅक्सी चालकांनी अहोरात्र सेवा जनतेला दिली आहे. जनतेलाही ऑटो रिक्षा, टॅक्सी वाहनांची खूप मोठी मदत कोरोना काळात झाली होती.आजही रात्री अपरात्री एमर्जन्सीच्या वेळेत टॅक्सी चालक, रिक्षा चालक महत्वाची भूमिका निभावत आहेत. उरण मध्ये स्थानिक भूमीपुत्र, शेतकरी या व्यवसायात खूप मोठया प्रमाणात आहेत. मात्र काही प्रवाशांनी व उरण तालुक्यातील पूर्व विभागातील वेशवी , दिघोडे,विंधणे,कळंबूसरे या ग्रामपंचायतने गव्हाण फाटा ते चिरनेर कोप्रोली या मार्गावर NMMT ची बससेवा सुरु करावी अशी मागणी NMMT प्रशासनाकडे केली आहे. मात्र NMMT च्या बसेस या मार्गावर अजून सुरु झाले नसले तरी या मार्गावरील NMMT च्या बस सेवेला उरण पूर्व विभागातील चिरनेर व गव्हाण फाटा मार्गावरील वेगवेगळ्या ऑटो रिक्षा, टॅक्सी संघटनेने जोरदार तीव्र विरोध केला आहे.
गव्हाण फाटा ते चिरनेर या मार्गावर NMMT ची बससेवा सुरु करण्यात येऊ नये या मागणीसाठी तसेच NMMT च्या सेवेला विरोध करण्यासाठी गव्हाण फाटा ते चिरनेर या मार्गावरील सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या चालक मालक संघटनेची बैठक चिरनेर येथे सकाळी 11 वाजता संपन्न झाली यावेळी भाजपा कार्यकर्ते प्रसाद पाटील, चिरनेर तंटामुक्ती अध्यक्ष अलंकार परदेशी, भाजपा कार्यकर्ता सुशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य चिरनेर रमेश फोफेरकर, ग्रामपंचायत सदस्य चिरनेर नमस्ते मोकल, ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत, सुदेश पाटील आदी पदाधिकारी तसेच रिक्षा, टॅक्सी युनियनचे प्रतिनिधी – विजय म्हात्रे, संतोष भगत, अशोक घरत, विकास पाटील, संतोष पाटील, सचिन भगत, नरेश घरत, रुपेश भगत, विलास म्हात्रे, अनंत नारंगीकर, कैलास ठाकूर, संदेश पाटील, भूषण ठाकूर, अविनाश परदेशी, सचिन पाटील, दर्शन जोशी, अजित थळी, वैभव पाटील, गिरीश म्हात्रे, सचिन म्हात्रे, बळीराम फोफेरकर, दिलीप परदेशी, आदित्य घरत, संतोष नारंगीकर, अमित म्हात्रे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

एकीकडे काही प्रवाशी व 3,4 ग्रामपंचायतने गव्हाण फाटा ते चिरनेर मार्गावर नवी मुंबई परिवहन सेवेची (NMMT )बससेवा सुरु करावी अशी मागणी केली आहे.तर दुसरीकडे या प्रवाशांच्या व ग्रामपंचायतच्या मागणीला ऑटो रिक्षा, टॅक्सी युनियन /संघटनेने तीव्र विरोध दर्शवीला आहे.सहा आसनी मिनिडोअर चालक मालक संघटना मधला स्टॉप चिरनेर हायवे , श्री महागणपती ऑटो रिक्षा चालक मालक संघटना चिरनेर हायस्कुल, बापूजीदेव रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना कोप्रोली, जय शिवराय चालक मालक संघटना विंधणे, सहा आसनी चालक मालक कल्याणकारी संघटना गव्हाण फाटा -पनवेल -चिरनेर, स्वराज्य रिक्षा चालक मालक संघटना दिघोडे दास्तानफाटा आदी विविध रिक्षा, टॅक्सी संघटनेने एकत्र येत गव्हाण फाटा ते चिरनेर या मार्गावर एन एम एम टी ची बससेवा सुरु करण्यात येऊ नये अशी मागणी NMMT प्रशासनाकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.