ओणनवसे- पाटीलवाडी येथे विद्यार्थीनींनि दाखवले अझोला निर्मितीचे प्रात्यक्षिक
दापोली (प्रतिनिधी) : विदयार्थी ग्रामीण उदयोजकता जागृती विकास योजनेंतर्गत (रावे) भातशेतीसाठी खत व जनावरांना खादय म्हणुन वापरल्या जाणाऱ्या अझोला निर्मितीचे प्रात्यक्षिक दापोली तालुक्यातील ओणनवसे – पाटीलवाडी येथील शेतकयांना दाखवण्यात आले. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनींनी शेतकऱ्यांना हा विषय समजुन सांगत प्रात्यक्षिक दाखवले.
( कृषिप्रणाली गटातील ) दानिया मुल्ला, श्रद्धा मुंढेकर, युक्ता चव्हाण, अनामिका जागुष्टे, ऋतुजा खरात, प्रथा नाईक सुप्रिया नाईक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अझोला भातशेतीसाठी उपयुक्त आहे. गुरे, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या इत्यादींना अझोला खादय म्हणुन दिले जाते. अझोला हे जलशेवाळासारखे दिसणारे तरंगते फर्न आहे. अझोलाच्या वापरामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण टिकून ठेवले जाते तण नियंत्रण करता येते. भाताची चांगली वाढ होवून उत्पन्न वाढते. भातशेतातील बाष्पीभवन कमी होते. गायी बकऱ्या यांच्या दुधाचे प्रमाण वाढते याची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना या विद्यार्थ्यांनींनी दिली. अझोला निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवताना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी महाविदयालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.उत्तम महाडकर, प्रा. डॉ.वैभव राजेमहाडिक, डॉ.आनंद दांडेकर, डॉ.नंदा मयेकर , डॉ. शिगवण, डॉ. प्रसादे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.