क्रीडा विभागातर्फे 21 रोजी योग दिनाचे आयोजन
रत्नागिरी : दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. योग दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्विकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे.
योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र यांचे माध्यमातून व जिल्हा योग संघटनेच्या सहकार्याने बॅडमिंटन हॉल,छत्रपती शिवाजी स्टेडियम मारुती मंदिर, रत्नागिरी येथे 21 जून 2022 रोजी सकाळी 7.30 वा.आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. तरी सदर योग दिना करीता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी, जिल्हा प्रशासन व नेहरू युवा केंद्र यांचे वतीने करण्यात आले आहे.