फुटबॉल संघ निवडीसाठी चाचणी
रत्नागिरी : फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षणाकरिता व संघ उभारणीकरता नव्याने खेळडू भरतीकरिता पुणे व कोल्हापूर विभाग निवड चाचणी शिवछत्रपती क्रिडा संकुल बालेवाडी येथे 169 व 20 जुन 2022 रोजी सकाळी07.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
निवड चाचणी करिता 14 वर्षाखालील खेळाडूंची जन्मतारीख ही 01 जानेवारी 2009 ते 01 जानेवारी 2013 दरम्यान असावा आणि उंची 158 सेंमी च्या वर असावी. तर 16 वर्षाखालील खेळाडूंची जन्मतारीख 01 जानेवारी 2006 ते 01 जानेवारी 2008 या दरम्यान असावी आणि उंची 165 सेंमी च्या वर असावी.
खेळाडूंची उंची, शारिरीक क्षमता, कौशल्य चाचणी आणि खेळातील कामगिरी हे निवड चाचणीचे निकष आहेत.
खेळाडूंची फक्त निवासी व्यवस्था करण्यात येणार असून प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करण्यात यावा. चाचणीस येताना खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला सोबत आणायचा आहे. सदर चाचणीमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी सर्व माहिती 17 जून 2022 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावी असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, रत्नागिरी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.