रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी व उरण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज सायंकाळी रोजगार मेळावा
उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण विभागातील विविध आस्थापनांमध्ये (सीएफएस, पोर्ट मध्ये ) स्थानिक भुमिपुत्रांना पात्रता असुन सुद्धा नोकरीत डावलले जाते. व बाहेरील कामगारांची भरती केली जाते. आपल्या विभागात बरेच सुशिक्षित तरूण-तरूणी बेरोजगार आहेत. सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिकांनी आवाज उठविणे गरजेचे आहे. यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका काँग्रेस रोजगार कमिटीची स्थापना करण्यात आलेली आहे.
या कमिटीतर्फे स्थानिक तरूण-तरूणींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी उरण तालुक्यातील सुशिक्षित तरूण तरुनींनी स्वतः आपला बायोडेटा घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत उपस्थित राहणार आहेत.सदर रोजगार मेळावा दिनांक 28 जुलै 2022 रोजी सायंकाळी ठिक 4 वाजता रत्नेश्वरी मंदीर सभागृह जसखार येथे होणार आहे.अधिक माहितीसाठी लंकेश ठाकूर फोन नंबर -9870070776,
हेमंत ठाकूर फोन नंबर-8425065456 यांच्याशी संपर्क साधावे.