समर कॅम्पमधून चिमुकल्यांनी दिले विश्व हिताचे संदेश!
उरण(विठ्ठल ममताबादे ): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अंतर्गत उरण येथे दिनांक 12 मे ते 21 मे 2022 दरम्यान चालू असलेल्या फुटबॉल खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीरामध्ये दिनांक 20/5/2022 रोजी द्रोणागिरी डोंगरावर ट्रेकिंगचा कार्यक्रम घेण्यात आला असून त्याच्यात भाग घेतलेल्या सर्व पालक व विद्यार्थ्यांनी सर्वांना पोस्टरद्वारे विश्व हिताचे महत्वपूर्ण संदेश दिले आहे. प्रत्येकाने रोजचा दिनचर्या मध्ये प्लास्टिक चा वापर टाळणे हे खूप गरजेचे आहे. प्राणी व विश्व पर्यावरण हिताचे आहे. असा संदेश दिला.रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व सचिन निकम यांच्या मार्गदर्शना खाली क्रीडा शिक्षक व सेव्हेन स्टार फुटबॉल अकॅडेमी उरणचे फुटबॉल प्रशिक्षक प्रवीण तोगरे, नंदिनी प्रवीण तोगरे व समस्त विद्यार्थी व पालकांनी मिळून हा उपक्रम द्रोणागिरी डोंगरावर सकाळी साफ सफाई करून सफलतापूर्वक राबविला.पर्यावरण विषयक जनजागृती करून एक चांगला संदेश सदर विद्यार्थ्यांनी समाजात पोहोचवला आहे.