उरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नोओझाइम्स साऊथ आशिया प्रा.लि.पाताळगंगा प्लान्टचे मॅनेजर बालाजी अमिरथर्लिंग पांडियन आणि वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिकणा-या गोर गरीब गरजू मुलींना सुकन्या प्रवास सवलत म्हणून रोख प्रत्येकी 500/-रू प्रमाणे 12 मुलींना आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.
तसेच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वशेणी मध्ये शिकणा-या इयत्ता पाचवी ते सातवी मधील 54 मुलांना कंपास पेटी चे वाटप करण्यात आले.
या वेळी आदिनाथ पाटील, संदेश गावंड,डाॅक्टर रविंद्र गावंड,पुरूषोत्तम पाटील,सतिश पाटील, संजय पाटील,अनंत तांडेल, बी.जे म्हात्रे, सतिश पाटील,अनंता पाटील,प्रविण ठाकूर,कैलास पाटील, महेंद्र पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.