https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

10 जुलैपर्यंत वादळी वारे वाहण्याचा इशारा

0 58

मासेमारांना समुद्रात न जाण्याची सूचना

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार, दि. 06 जुलै ते 10 जुलै 2022 या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४०-५० कि.मी ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

मच्छीमारानी संबधीत कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संग्रहित

Leave A Reply

Your email address will not be published.