चिरनेरमधील पहिले एसएससी उत्तीर्ण कृष्णा कडू गुरुजी यांचे निधन
उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे ) : चिरनेर गावातील पहीले एसएससी झालेले व शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुख पदावरुन निवृत्त झालेले कृष्णा कडू गूरुजींचे आल्पशा आजाराने निधन झाले.निधन समयी त्यांचे वय 78 वर्ष होते. त्यांचा आंत्यविधी चिरनेर स्मशान भूमिमध्ये पार पडला. यावेळी आप्त स्वकीयांसोबतच समाजातील विवीध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारतीय तोफखान्यातील निवृत सैनिक सचिन कडू यांचे ते वडील होते. त्यामूळे ते एक विरपिता देखील होते.
कृष्णा कडू हे एस.एस.सी पास होणारे चिरनेर गावातील पहीले व्यक्ती होते.पुढे शिक्षण क्षेत्रात केंद्रप्रमुख पदावरुन ते निवृत्त झाले. दरम्यान,त्यांनी शासनाने देवू केलेले विस्तार अधिकारी पद दोन वेळा नाकारले.उत्कृष्ट कबड्डीपट्टू आसलेले कडू गूरुजींनी दोन वेळा पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक म्हणून काम केलं.तसेच चिरनेर कातळपाडा दत्त मंदिरीर बांधण्याची मूहूर्तमेढ ते गावकीचे आध्यक्ष असताना त्यांच्या संकल्पनेतून रोवली गेली. शिक्षण क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर शेती व समाजसेवेमध्ये त्यांनी स्वत: ला झोकून दिले होते.सद्ध्या ते या वयात देखील शेतकर्यांच्या सातबार्यावरील त्रासदायक 35 सेक्शन हटवीण्यासाठी पुढाकार घेवून ते काम करत होते.पण त्यांच्या मृत्यूने या चळवळी मध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी इंदूमती कडू,तसेच भारतिय तोफखान्यातील निवृत्त सैनिक सचिन कडू, रमेश कडू, पोलीस हवालदार सुवर्णा कडू व दै.पत्रकार संघाचे सचिव पत्रकार सुभाष कडू हि मूलं व जावई सचिन मोकल, पोलीस हवालदार आश्वीनी कडू, आशासेवीका वैशाली कडू,आंगणवाडी सेवीका सुगंधा कडू या सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा दहाव्याचा कार्यक्रम रविवार दि.31 जूलै रोजी चिरनेर खाडी येथे होणार आहे. बारावे कार्य मंगळवार दि.2 ऑगस्ट 2022 रोजी चिरनेर येथे राहत्या घरी होणार आहे