देवरुख : रत्नागिरी -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावाच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होऊन स्वार प्रौढाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकी चोराची पत्नी पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
विजय जाधव (५०) कोल्हापूरहून संगमेश्वरच्या दिशेने जातं होते. सोबत पत्नी आणि मुलगा होता. साखरपा येथे ते आले असता नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे निसरड्या बनलेल्या रस्त्यावरून त्यांची दुचाकी घसरून आपघात झाला. या अपघातात विजय जाधव हे अपघातस्थळी दुचाकीवरून फरफटत गेले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जाधव यांची पत्नी सविता विजय जाधव, मुलगा अजय विजय जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघातात जखमी झालेल्या दोघांना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस आऊट पोस्ट कर्मचारी घटनास्थळी पोहचले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पोलिसांनी पाठविले.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदेश जाधव,अर्पिता दुधाने, राहुल गायकवाड, प्रशांत नागवेकर आदी करीत आहेत. रात्री उशिरा पर्यंत पंचनामा व शव विच्छेदन साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू होते.