रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका साप्ताहिक एक्सप्रेसला ज्यादा डबे जोडण्यात येणार आहेत. हिसार जंक्शन ते कोईमतुर या साप्ताहिक एक्सप्रेसला दि. 3 मे ते 31 मे 2023 या कालावधीसाठी अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहेत.
उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांना गर्दी वाढू लागल्यामुळे काही गाड्यांना या आधीच अतिरिक्त कोच जोडण्यात आले आहेत.
कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार हरियाणा राज्यातील हिसार जंक्शन ते तामिळनाडूमधील कोयमतुर दरम्यान धावणाऱ्या 22 475/ 22 476 या गाडीला जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वातानुकलीत टू टायर श्रेणीचे दोन अतिरिक्त कोच जोडले जाणार आहेत.
या संदर्भात रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हिसार जंक्शन ते कोईमतुर या मार्गावर धावताना तीन ते 31 मे 2023 तर कोईमतुर ते हिसार जंक्शन या मार्गावर धावताना 6 मे ते 3 जून 2023 या कालावधीत गाडीला वाढीव दोन डबे जोडले जातील