Ultimate magazine theme for WordPress.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आठ तहसीलदारांना नव्या वाहनांचे वितरण

0 310

रत्नागिरी, दि. 10   : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 8 तहसीलदारांना चावी प्रदान करुन 8 नव्या वाहनांचे वितरण आज करण्यात आले.
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून पालकमंत्री श्री. सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तहसीलदारांसाठी 8 नव्या बोलेरो घेण्यात आल्या. जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या लेखाशीर्ष खाली 81 लाख 92 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला.

या नव्या वाहनांचा जिल्ह्यासाठी प्रशासकीय कामकाजासाठी निश्चितच उपयोग होणार आहे. या वाहन वितरण प्रसंगी सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदूर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह तहसीलदार उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.