https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

मच्छिमार बांधवांनी मतदानाचा हक्क बजावावा :  पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

0 67


रत्नागिरी :  मच्छिमार बांधव, नौका मालक या सर्वांनी २० नोव्हेंबर रोजी मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.


२६६ रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये मच्छिमारांच्या जनजागृतीसाठी आज बोट रॅली काढण्यात आली. त्यावेळी आवाहन करताना श्री. कुलकर्णी म्हणाले, भगवती, मिरकरवाडा बंदरामध्ये बोट रॅली काढून जनजागृतीचा प्रशासनाने अनोखा उपक्रम आज राबविला आहे. मच्छिमार बांधवांचा सहभाग मतदानामध्ये असला पाहिजे या उद्देशाने त्यांच्यामध्ये जागृती व्हावी म्हणून ही अनोखी रॅली आहे. १५० पेक्षा अधिक बोटी या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. या रॅलीच्या माध्यमातून सर्व मच्छिमार बांधव व्यावसायिक बोट मालक या सर्वांना मी आवाहन करतो येत्या २० तारखेला मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत-उपजिल्हा निवडणूक अधिकारी
मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढविण्यासाठी स्वीप कार्यक्रमातंर्गत आजची जनजागृतीपर बोट रॅली काढण्यात आली आहे. मतदानाचा हा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले. निश्चितच मतदान जनजागृतीच्या अशा रॅलीमुळे मच्छिमार बांधव, बोट मालक आणि त्यांचे कुटूंबातील सदस्य पात्र मतदार मतदानाची टक्केवारी वाढवतील आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडतील.


मतदान करुन मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडावे-जीवन देसाई
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदारांनी अधिकाधिक संख्येने घराबाहेर पडून प्रथम आपले मतदान करावे आणि लोकशाहीमध्ये आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन २६६ रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी केले. मतदान केंद्रांवर विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. मतदान चिठ्ठीचे घरोघरी वाटप केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. मतदान हा आपला हक्क अधिकार आणि कर्तव्य आहे ते सर्व मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी पार पाडावे.

Leave A Reply

Your email address will not be published.