कुणकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बससेवा
कणकवली, मालवण तसेच विजयदुर्ग बस स्थानक येथून कुणकेश्वरसाठी ही सेवा असेल. रोज दहा बसेस भाविकांसाठी धावणार असल्याची माहिती आ. नितेश राणे यांनी दिली आहे. या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली : महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी मालवण येथून मोफत बस सेवा दि २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत सुरु ठेवली जाणार आहे.